जळगावात नगरसेवक, महापौरांवर गुन्हा दाखल - Marathi News 24taas.com

जळगावात नगरसेवक, महापौरांवर गुन्हा दाखल

www.24taas.com, जळगाव
 
जळगावातील घरकुल घोटाळ्यातल्या चौघा आरोपींना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्कालीन नगरपालिकेत शहरात नऊ ठिकाणी उभारलेल्या ११ हजार ४२४ घरकुलांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता.
 
याप्रकरणी ३ फेब्रुवारी २००६ रोजी आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, मुख्याधिकाऱ्यांसह ९४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यातला मुख्य आरोपी तसंच उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डरचे संचालक राजेंद्र वाणी, नाना वाणी आणि मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना शनिवारी अटक करण्यात आली.
 
त्यानंतर या चौघांनाही जळगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. घोटाळ्याच्या तपासासाठी सरकारी पक्षाने अवधी हवा असल्याची मागणी न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाचे बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published: Monday, January 30, 2012, 17:49


comments powered by Disqus