Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:51
www.24taas.com, नाशिक सुहास कांदेसह १२ जणांना नाशिक पोलिसांनी तडीपारीची नोटिस बजावली आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाईला सुरवात केली आहे. पूर्णवेळ आयुक्त नसलेल्या नाशिक पोलिसांची धावपळ सुरु झाली आहे.
गेल्या काही वर्षात नाशिक शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात भयावह वाढ झाली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूका होत असल्याने पोलिस दलासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
First Published: Wednesday, February 1, 2012, 12:51