नाशिकच्या मतदार यादीत घोटाळा ? - Marathi News 24taas.com

नाशिकच्या मतदार यादीत घोटाळा ?

Tag:  
योगेश खरे, www.24taas.com, नाशिक
 
नाशिक महापालिकेच्या मतदार यादीत मोठा गोलमाल झाल्याचं दिसून येतंय. २३ तारखेला जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीत ३१ तारखेपर्यंत तब्बल २३५१ मतांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
 
नाशिक महापालिकेची ही अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली होती. २३ तारखेला प्रभाग क्रमांक ५४ मध्ये २७९६ मतदार होते. ३१ तारखेला या मतदार यादीत तब्बल ५१४७ मतदार झाले आहेत. म्हणजेच फक्त आठ दिवसात यादीमध्ये तब्बल २३५१ मतदार वाढले आहेत. अचानक हा बदल झाल्याने सर्वच जण साशंक आहेत.
 
एका उमेदवाराचं नाव मतदार यादीत नसल्यामुळं एका जागी शिवसेनेला उमेदवार मिळाला नाही. त्यावेळी नाव वगळण्याचे किंवा नोंदवण्याचे अधिकार आपल्याला नाहीत असं सांगणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक विभागनं ही नावे कशी समाविष्ट केली हे न समजणारं कोडं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.
 
नाशिक महापालिकेच्या प्रभागांची मतदारसंख्या आणि सध्याची मतदार संख्या यामध्येही दीड ते दोन लाख मतदारांचा फरक आहे. त्यामुळं यावेळची निवडणूक रामभरोसेच म्हणावी लागेल.
 

 

First Published: Thursday, February 2, 2012, 23:05


comments powered by Disqus