नाशिक महापालिकेत नोकरभर्तीचा वाद ! - Marathi News 24taas.com

नाशिक महापालिकेत नोकरभर्तीचा वाद !


झी २४ तास वेब टीम, नाशिक
नाशिक महापालिकेनं नोकरभर्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र या भर्तीवरुन वाद सुरु झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप होतोय.  यंदा पहिल्यांदाच खाजगी कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे कंपनीचा हस्तक्षेप लोकप्रतिनिधींना कितपत पचतो हेसुद्धा औत्सुक्याचं आहे. नाशिकमधल्या लोकप्रतिनिधींना गेल्या दोन महिन्यांपासून बेरोजगारांचा कळवळा आला आहे. प्रशासनामार्फत साडे नऊशे जागांसाठी नोकरभर्ती सुरु झाली. मात्र ही नोकरभर्ती म्हणजे लाखो तरुणांची फसवणूक असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप होत आहे.या भरतीप्रक्रियेमुळे महापालिकेतही नाराजी आहे. जे कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र होते, त्यांना डावललं जाणार असल्यानं त्यांच्यामध्ये नाराजी आहे. तर आयुक्तांच्या मते सगळं काही नियमानुसार होत आहे.
 
नाशिकमध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी झालेली भरती प्रक्रियाही वादात सापडली होती. त्यातल्या अनेकांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. आता पुन्हा भरतीचा घाट घातला जात असल्यानं ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबविली जाईल की नाही, यामध्ये शंका आहे.

First Published: Tuesday, November 1, 2011, 12:35


comments powered by Disqus