नद्या झाल्या वाळवंट, वाळू झाली सोनं - Marathi News 24taas.com

नद्या झाल्या वाळवंट, वाळू झाली सोनं

झी २४ तास वेब टीम, जळगाव
 

जळगावात नद्या अक्षरश: वाळवंट बनल्या आहेत आणि वाळू  म्हणजे  सोनं झालं आहे. कारण वाळुचा अमर्याद उपसा केला जातो आणि प्रशासन असा वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यातुनही कमाई करते. त्यामुळे नद्यांचा मोठा प्रश्न पुढच्या काळात उभा राहू शकतो अशी भिती व्यक्त केली जाते.
 
जळगातल्या वाळुमाफियांसाठी सोन्याची खाण असलेल्या याच गिरणेच्या पात्रातून नाशिक,मुंबईपर्यंत वाळूची वाहतूक चालते,त्यामुळे गिरणेच्या वाळुला मोठी मागणी आहे. यावर्षी जळगावातली वाळू 50 कोटींना विकली जाते त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. खरतर वाळू उपशाचे ठेके देतांना नदीपात्रातून किती प्रामाणात आणि केव्हा उपसा करावा याविषयी नियमावली असते पण जळगावात ती फक्त कागदावरच राहिलेली दिसते.

First Published: Friday, November 4, 2011, 08:24


comments powered by Disqus