Last Updated: Monday, February 20, 2012, 14:32
www.24taas.com, त्र्यंबकेश्वर 
आज महाशिवरात्र. मुंबईसह राज्यभर आज महाशिरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो आहे. रात्रीपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
आरती, भजन किर्तनाने वातावरण भक्तीमय झालं आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्यातूनच नाही तर देशभरातून महाशिवरात्रीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी येत असतात. खासकरून उत्तरप्रदेश आणि बिहारमधून भाविक महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये येत असतात. महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन इथे करण्यात आलं आहे.
दुपारच्या सुमाराला त्र्यंबक महाराजांना अभ्यंगस्नान घातलं जाणार आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर हे एक छोटं शहर असल्यामुळे देशभरातून दाखल होणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरवताना नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
First Published: Monday, February 20, 2012, 14:32