Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

झी २४ तास वेब टीम, मुंबई
मालेगावातील २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील सर्व नऊ आरोपींची पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. या आरोपींची सुटका मंगळवारी होणार आहे. मालेगावात ८ सप्टेंबर २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता.
एटीएसने हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या तपासात हा बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, असिमानंद यांना अटक करण्यात आली होती. असिमानंद यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी बॉम्बस्फोटातल्या सहभागाबाबत कबुली दिली होती. त्यामुळेच पकडण्यात आलेल्या संशयित मुस्लिम आरोपींची मुक्तता करण्या शिवाय पर्याय उरला नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संशयित आरोपींच्या जामीनाला विरोध केला नाही.
First Published: Saturday, November 5, 2011, 13:24