महंताचं कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News 24taas.com

महंताचं कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमधील चांदवड तालुक्यात एका महंतानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ज्ञानप्रसारक द्वारकाधीश आश्रमात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे. पिडीत मुलगी अनाथ असल्यानं ती या आश्रमात शिष्य म्हणून काम करत होती. अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या ४ वर्षांपासून अनेकदा बलात्कार केला जात होता.
 
त्यानंतर मुलीनं यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यावर राजधर पालिमकरशास्त्री या नराधमासह जयश्री पालिमकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या आश्रमावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. पोलीस पुढील तपास करत असून अशा प्रकारे आश्रमातील इतरांवरही अत्याचार झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पालिमकरशास्त्री यानं पाच सहा वर्षांपूर्वीच हा आश्रम स्थापन केला होता.
 
तसंच सहआरोपी असलेली जयश्री पालिमकर हि त्याला आश्रमाच्या कामात मदत करत असल्याचं आत्ता पर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं आहे. तसंच या आश्रमात प्राधान्यानं महिलांनाच प्रवेश दिला जात असल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे आश्रमातही महिला असुरक्षित असल्याचं या घटनेनंतर उघड झालं आहे.
 
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 12:14


comments powered by Disqus