Last Updated: Friday, February 24, 2012, 17:14
www.24taas.com, नाशिक नाशिकमधील बोगस व्होटिंग कार्ड बनवणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतल्या एकानंच याबाबतची माहिती उघड केली. मुंबईत निवडणूक आयोगाकडं याबाबत त्यानं तक्रारही दाखल केली आहे.
भोपाळच्या आतिशा इन्फोटेक या कंपनीला व्होटिंग कार्ड बनवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र कंत्राट संपल्यानंतर या ठेकेदारानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच तहसीलदारांचा बनावट शिक्का वापरून बोगस व्होटिंग कार्ड बनवण्याचा गोरख धंदा थाटला होता.
First Published: Friday, February 24, 2012, 17:14