शाळेत शौचालय नाही तर मान्यता रद्द होणार - Marathi News 24taas.com

शाळेत शौचालय नाही तर मान्यता रद्द होणार

www.24taas.com, जळगाव
 

कोर्टाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये शौचालय सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या शाळा शौचालय बांधणार नाहीत त्यांची मान्यता काढून घ्यायचा सरकारचा विचार आहे. जळगावमध्ये अशा १८३ शाळांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
 
जळगाव जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत जवळपास १९०० शाळा आहेत. त्यापैकी सव्वाशे शाळांना शौचालये नाहीत. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शाळेत शौचालय सक्तीचं करण्यात आलं आहे. त्यांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्या शाळांची मान्यता काढून घेण्याचा विचार आहे.
 
पडताळणीनंतर बेहाल झालेल्या शाळांना आणखी एक मुदत देण्यात आली आहे. नोटीस आल्यानंतर शाळाही कामाला लागल्या आहेत. शाळेत शौचालय गरजेचं आहे. त्यामुळं याबाबत प्रशासनानं कठोर राहून शाळांकडून त्याची अंमलबजावणी करुन घेणं महत्त्वाचं आहे.
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 09:46


comments powered by Disqus