Last Updated: Thursday, March 1, 2012, 21:16
www.24taas.com, नाशिक 
नाशिक महापालिका निवडणुकीतल्या पराभवाला जबाबदार धरुन शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. शिवसेनेच्या या निर्णयानंतर इतर पक्षांमध्येही चलबिचल सुरू झालीय. आता कुणाचा नंबर लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 108 जागांवरुन 122 जागांसाठी निवडणूक लढवली गेली. गेल्या वेळपेक्षा 14 जागा जास्त असूनही त्याचा फायदा फक्त मनसेलाच घेता आला. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभवाचं धनी व्हावं लागलं. या डॅमेजनंतर कंट्रोल करत शिवसेनेनं कार्यकारिणी बरखास्त केली. शिवसेनेप्रमाणेच इतर पक्षांनीही अशी कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागलीय.
एकूणच महापालिका निवडणुकीतल्या पराभवाची आता कारणमीमांसा सुरू झालीय. शिवसेनेच्या निर्णयानंतर इतर पक्षांवरचा दबाव वाढणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे पदाधिका-यांचं लक्ष लागलं असून जो तो आपलं पद वाचवण्याच्या प्रयत्नात आहे.
First Published: Thursday, March 1, 2012, 21:16