नाशिक महापालिकेत शिवसेनेची वाढली धुसफूस - Marathi News 24taas.com

नाशिक महापालिकेत शिवसेनेची वाढली धुसफूस

झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
नाशिकमध्ये शिवसेनेतली धुसफूस वाढते आहे. याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरत आहे ते महापौर नयना घोलप आणि त्यांच्या कुटुंबीयांचं वर्तनामुळे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महापौर वगळता शिवसेनेच्या एकही नेत्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं.
 
मुख्यमंत्री, नाशिक महापालिकेचे आयुक्त आणि महापौर नयना घोलप यांच्या उपस्थितीत होत असलेला  सोहळा महापालिकेच्या विभागीय कार्यलयाच्या भूमीपूजनाचा होता. महापौर शिवसेनेचा असला तरी शिवसेनेचा एकही नेता या कार्यक्रमाला नाही. त्यामुळे ही संधी साधत, महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, निधी राज्य सरकारच देत असल्याचं सांगत बाजी मारण्याची संधी सोडली नाही.
 
महापौरांच्या या कार्यक्रमावरुन शिवसेनेच्याच नेत्यांनी महापौरांना टार्गेट केलं. घोलप कुटुंबीय सध्या प्रोटोकॉलनुसार वागत नसल्य़ाचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला. तर महापौरांनी महा माहीतच नाही, अशी धक्कादायक भूमिका घेतली. महापालिका निवडणुका तोंडावर असताना महापौरांनी कार्यक्रमाला सेना नेतृत्वाला न बोलावण्याची चूक केली, त्याचबरोबर विकासकामांचं श्रेय घेण्याची संधीही गमावली.

First Published: Tuesday, November 8, 2011, 16:28


comments powered by Disqus