धुळे रेल्वेची ट्रॅक्टरला धडक, २ ठार - Marathi News 24taas.com

धुळे रेल्वेची ट्रॅक्टरला धडक, २ ठार

झी २४ तास वेब टीम, धुळे
 
धुळे-चाळीसगाव रेल्वेगाडीने आज रुळ ओलांडणा-या एका ट्रॅक्टरला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर सात जण जखमी झाले.
 
या अपघातात मनोहर किरण शेलार (३५ )आणि सुहास रामदास माने (३८ ) जागीच ठार झाले. हे दोघंही धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गावर धुळ्यापासून २१ किमी अंतरावर जुनवणे गावाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. जुनवणे गावाजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक नाही. त्यामुळे रुळ ओलांडूना वाहने सुसाट धावत असतात. बुधवारी सकाळी एक ट्रॅक्टर रुळ ओलांडत असताना धुळ्याहून चाळीसगावकडे जाणा-या प्रवासी गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली.
 
दरम्यान, या अपघातात सात जण जखमीही झाले असून त्यांच्यावर धुळयाच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर धुळे-चाळीसगाव रेल्वे काही काळ घटनास्थळी थांबली होती. धुळे तालुका पोलिसांनी पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.

First Published: Wednesday, November 9, 2011, 11:09


comments powered by Disqus