बिबट्याचा हल्ला बहिणीवर, भावाने घेतले जीवावर - Marathi News 24taas.com

बिबट्याचा हल्ला बहिणीवर, भावाने घेतले जीवावर

www.24taas.com, जळगाव
 
नरभक्षक बिबट्यानं पकडलेल्या १४ वर्षांच्या बहिणीची भावानं सुटका केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या तोंडापूर शिवारात घडली आहे. फरीदा खाँ शेतातून कापूस वेचून परत येत असताना तिच्यावर तोडापूर शिवारात बिबट्यानं हल्ला केला.
 
फरीदाला या बिबट्यानं आपल्या जबड्यात पकडलं असताना तिथून काही अंतरावर असलेल्या बिस्मिल खाँनं तिच्याकडं धाव घेत बिबट्याशी झुंज देत फरीदाची सुटका केली. नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून बहिणीची सुटका करणाऱ्या या तरुणाच्या हिंमतीला सगळ्यांनीच दाद दिली.
 
फरीदाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्यामुळे पुन्हा एकदा जनावरांपासून सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन तिथे कोणते उपाय योजणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
 

First Published: Monday, March 5, 2012, 20:32


comments powered by Disqus