बोगस मतदार कार्डांचा झाला पर्दाफाश - Marathi News 24taas.com

बोगस मतदार कार्डांचा झाला पर्दाफाश

www.24taas.com, नाशिक
 
महापालिका निवडणूकीतील बोगस ओळखपत्र तयार केल्याचा गौप्यस्फोट करणारा कन्हैया परदेशी उपविभागीय कार्यालयात स्व:तहून हजर झाला. त्याची नाशिकचे उपविभागीय अधिकारी निलेश सागर यांच्या दालनात चौकशी झाली.
 
आता बनावट ओळखपत्र बनवण्याचा ठेका घेतलेल्या विजय कसबे यांचीही चौकशी होणार असून तोही जिल्हाअधिकारी कार्यालयात हजर झाला. बनावट ओळखपत्र बनवण्यात काही सरकारी अधिकाऱ्यांची समावेश असून त्यानं आपल्या जिवाला धोका असल्याचही म्हटलेलं आहे.
 
तसचं पोलिसांनी आपल्याला अटक करावी अशी मागणीही त्यानं केली आहे. त्यामुळे आता बोगस मतदार कार्डांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता यात सरकारी अधिकारी काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
 
 

First Published: Monday, March 5, 2012, 22:56


comments powered by Disqus