अपहरणकर्त्यांला २४ तासात केलं जेरबंद - Marathi News 24taas.com

अपहरणकर्त्यांला २४ तासात केलं जेरबंद

झी २४ तास वेब टीम, जळगाव
 
अपहरणाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशी काही एक घटना घडली ती जळगावमध्ये. अपहरण केल्यानंतर लगेचच २४ तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
जळगावात पाच वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्याला पोलीसांनी २४ तासात जेरबंद केलं. ऋषीकेश चौधरी असं अपहरणकर्त्यांचं नाव आहे. त्याने संजय शामनानी या कापड व्यापाऱ्याचा मुलगा पिय़ुषचं मंगळवारी रात्री अपहरण केलं होतं. याबाबत सतर्कता म्हणून पोलीसात केवळ तोंडी तक्रार करण्यात आली होती. आज असोरा गावात पोलीसांनी या आरोपीला अटक केलीय. त्याच्याविरोधात अपहरण, छळ तसंच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published: Thursday, November 10, 2011, 14:13


comments powered by Disqus