रूग्णाचा जीव गेल्याने हॉस्पिटलची तोडफोड - Marathi News 24taas.com

रूग्णाचा जीव गेल्याने हॉस्पिटलची तोडफोड

झी २४ तास वेब टीम, जळगाव

जळगाव मध्ये एका रूग्णाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे, रूग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये 8 वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. साहिल बाविस्कर या 8 वर्षाच्या मुलाला टाईफाईड झाला होता. साहिलला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सलाईनमधून देण्यात आलेल्या इंजेक्शनची रिएक्शन होऊन साहिलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तर शवविच्छेदनानंतरच मृत्युचं खरं कारण सांगता येईल, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, हॉस्पिटलची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.हॉस्पिटलची तोडफोड होणे किंवा डॉक्टरांना मारहाण होणे यासारखे प्रकार हे नेहमीच होतात.

First Published: Friday, November 11, 2011, 15:13


comments powered by Disqus