Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:10
www.24taas.com, नाशिक नाशिक महापालिकेच्या सत्तासंपादनानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतलीय. नाशिकचा विकास करुन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय. तसंच ही सुरूवात असल्याचं सांगत नव्या राजकीय समीकरणाच्या नांदीचे संकेत त्यांनी दिले आहेत.
लातूर महापालिकेत भाजपने महापौरपदासाठी शिवसेनेला बाहेर ठेवून मुस्लिम लीगचा पाठिंबा मिळवला, पण नाशिकात मला दिलेले समर्थन शिवसेनेला चालत नाही. मला समर्थन केले तर शिवसेनेत एवढा का थयथयाट? यातून शिवसेनेची वृत्ती महाराष्ट्राला दिसली अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.
First Published: Thursday, March 15, 2012, 15:10