Last Updated: Saturday, March 17, 2012, 08:48
www.24taas.com, जळगाव जळगावातल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस चौकशीला सामोरं गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आत्महत्या केली आहे. रामकृष्ण शिवराम सपकाळे असं त्याचं नाव आहे.
१९९७-९८ साली सपकाळे यांनी ईपीसी कंपनीकडून बारा हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. याच कारणावरुन त्यांची २० फेब्रुवारीला पोलीस मुख्यालयात चौकशी झाली होती. त्यांना आयकर विभागाची नोटीसही मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सपकाळे यांची पुन्हा पोलीस चौकशी होणार होती. मात्र त्याआधीच फुसणी गावातल्या समाजमंदिरात गळफास लावून आत्महत्या केली.
या आत्महत्येमुळे घरकूल घोटाळ्यातील संशयितांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय. इपीसी कंपनी घरकूल घोटाळ्यात अडकलेल्या राजेंद्र मयूर यांच्याशी संबंधित आहे.
First Published: Saturday, March 17, 2012, 08:48