त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटक महिलेवर बलात्कार - Marathi News 24taas.com

त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटक महिलेवर बलात्कार

www.24taas.com, नाशिक 
 
 
नाशिकमधील गुन्हेगारीचे पेव आता तीर्थस्थळ त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू लागलेत. त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच स्थानिक तरूणांना अटक करण्यात आलीय. दत्तात्रय कोरडे, मनोज परदेशी, अशोक झोले, गणेश झोले आणि पिंटू खोसकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वरनगरी हादरून गेलीय.
 
नाशिक शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आधीच त्रासलेले आहेत त्यात आता तीर्थस्थळंही सुरक्षित राहिले नसल्याचं या घटनेतून स्पष्ट होतंय. यातून पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, March 18, 2012, 12:26


comments powered by Disqus