शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं ठिय्या आंदोलन - Marathi News 24taas.com

शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं ठिय्या आंदोलन

www.24taas.com, नाशिक
 
कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी संघटनेनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प आहे.
 
जोपर्यंत सरकार हमीभाव जाहीर करत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळं विधानसभेत काय निर्णय होतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
काल शेतकरी संघटनेच्या वतीनं नाशकात चक्का जाम करण्यात आला तसच जिल्हाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवलं. आजही राज्यातील कांदाउत्पादक शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात बैठक झाली. तर नाशिकमध्ये जिल्हाधिकारी पी.वेलरासू, पोलीस आय़ुक्त सरंगल आणि आंदोलकांमध्ये बैठक सुरु होती.
 
 
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 12:43


comments powered by Disqus