Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:57
www.24taas.com, शिर्डी 
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शन रांगेत भक्ताचा मृत्यू झाला आहे. रात्री दर्शन रांगेत झोपलेला असताना भक्ताचा मृत्यू झाला आहे. सुनील चौरसिया असं या भक्ताचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे.
पहाटे सव्वा चारच्या काकड आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी भक्त रात्रीच रांगा लावतात. या रांगेत सुनील होता. रांगेत असताना काही भक्तांनी सुनीलला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काही हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांनी ही बाब मंदिर सुरक्षा रक्षकांना कळवली.
मंदिर प्रशासनाने त्याला लगेचच नजीकच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवलं. मात्र तिथं पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. पण भाविकाचा मृत्यू कशाने झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अशाप्रकारची गेल्या पंधरा दिवसांतली ही दुसरी घटना आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 11:57