Last Updated: Wednesday, March 21, 2012, 12:25
www.24taas.com, जळगाव 
जळगावमध्ये शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह एका कार्यकर्त्याने जैन यांच्या डॉक्टरला मारहाण करून अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. राठोड यांनी केली आहे.
घरकुल घोटाळाप्रकरणी कोठडीत असलेल्या सुरेश जैन याना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणलं, त्यावेळी हा वाद झाला. जैन याना ICU मध्ये नेताना गुलाबराव पाटील, मालपुरे, हर्षित पिपरिया यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार डॉ. राठोड यांनी पोलिसांत केली आहे.
तर पाठोपाठ मालपुरे यांनी देखील डॉक्टरांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि स्वतःहून अटकही करवून घेतली. याआधी जेव्हा पोलिसांनी जैन यांना अटक केली होती तेव्हा देखील पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांनी राडा घातला होता.
First Published: Wednesday, March 21, 2012, 12:25