नाशिकमध्ये भगर उत्पादक संतप्त - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये भगर उत्पादक संतप्त

www.24taas.com, मुकुल कुलकर्णी-नाशिक
 
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणा-या भगर उत्पादकांचा प्रश्न सुटलेला नाही. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईने भगर उत्पादक संतापलेत. त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
 
वारंवार पडणा-या छाप्यांमुळे भगरमिल मालक आक्रमक झालेत. भगरमधून विषबाधेचा प्रकार घडल्यावर माल जप्त करण्याची कारवाई केली जाते मात्र वेळोवेळी झालेल्या तपासण्यांमध्ये भगरमध्ये दोष नसल्याचं उघड झालय. भगरमिलवर छाप्याची कारवाई करुन या उद्योगाची बदनामी होत असल्याचा मिल मालकांचा आरोप आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणात देशभरात भगर जाते. त्यामुळं आता भगर व्यवसायायिकांना न्याय देण्यासाठी उद्योजक एकत्र आलेत.
 
अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई योग्य दिशेनं सुरु असल्याचा दावा केलाय. ज्यावेळी विषबाधा होते तेव्हा ग्लूकोसाईड चाचणी केली जात असल्याचं प्रशासनाचं म्हणण आहे. प्रमाणित भगर विक्रीसाठी खुली केल्याची माहिती प्रशासनानं दिली.
 
ज्या प्रमाणे उपवास करणा-यांना भगर हा आधार असतो तसंच या व्यवसायावर अनेकांची उपजीविका चालते. मात्र याबाबतच्या नकारात्मक चर्चेनं भगर उद्योगाला फटका बसतोय. याबाबत चर्चेतून मार्ग काढावा अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
 
 

First Published: Wednesday, March 21, 2012, 22:55


comments powered by Disqus