Last Updated: Thursday, March 22, 2012, 16:30
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जैन यांना पंधरा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने दिला.
सुरेशदादा जैन यांना १९९४ सालच्या घरकुल घोटाळ्यातील सहभागा प्रकरणी अटक करण्यात आली होती.
मात्र सुरेशदादा जैन यांना ३० दिवसांच्या आत परत शरणागती पत्करण्याची अट घालण्यात आली आहे. तसंच त्यांना येत्या २४ तासात आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. जैन यांना प्रसार माध्यमांशी तसंच कुटुंबा व्यतिरिक्त इतर कोणाशी बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
First Published: Thursday, March 22, 2012, 16:30