बिबट्याचा भर वस्तीत उच्छाद, चार जखमी - Marathi News 24taas.com

बिबट्याचा भर वस्तीत उच्छाद, चार जखमी

www.24taas.com, नाशिक
 
सध्या सर्वत्र एकाच प्राण्याची दहशत सुरू आहे. आणि तो प्राणी म्हणजे बिबट्या. एरव्ही भक्षकाच्या मागे लागून विहरीत बिबट्या पडण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या. मात्र नाशिकमध्ये बिबट्या चक्क एका बंगल्यात घुसला आहे.
 
गोदावरी काठच्या गजानन कॉलनीत पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या भक्षकाच्या मागे लागला आणि भान हरपून थेट नागरी वस्तीत घुसला. या बिबट्याला पाहताच अनेकांची पळापळ झाली. लोकांनी आरडाओरड केल्यामुळे भांबावलेल्या बिबट्यानं चौघांवर हल्ला केला. यात एक शाळकरी मुलगीही जखमी झाली आहे.
 
पळायला मार्ग नसल्यानं बिबट्यानं एका बंगल्यात धूम ठोकली सतर्क नागरिकांनी त्याला बंगल्यातल्या एका खोलीत कोंडून ठेवलं आहे. दुसरीकडे याच बंगल्यातल्या दुसऱ्या रूममध्ये एक महिला अडकली होती तिची सुटका करण्यात यश आलं आहे. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
 

First Published: Monday, March 26, 2012, 10:09


comments powered by Disqus