वाहनांची तोडफोड, पोलीस मात्र अपयशी - Marathi News 24taas.com

वाहनांची तोडफोड, पोलीस मात्र अपयशी

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकच्या विनय़नगर भागात अज्ञात समाजकंटकांनी  वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र पुन्हा वाहनांची तोडफोड सुरु करुन समाजकंटकांनी पोलिसांसमोर पुन्हा आव्हान निर्माण केलं आहे.
 
नाशिकच्या विनयनगर भागात वाहनांची तोडफोड करुन समाजकंटकांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला आव्हान दिलं. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजना किती पोकळ आहेत हेच या हल्ल्यानं सिद्ध झालं. विनयनगर भागात तोडफोड करणारे समाजकंटक दारुच्या नशेत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलिसांवरचा विश्वास कमी झाल्यानं नाशिककरांनी आता आपापल्या परिसरात गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 
नाशिकमधील समाजकंटकांची दहशत संपवण्यासाठी नवे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगळ यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांच्या कार्यकाळातही तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे समाजकंटकांनी एकप्रकारे पोलीस आयुक्तांनाच आव्हान दिलं आहे. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
 
 

First Published: Tuesday, March 27, 2012, 09:49


comments powered by Disqus