नाशिक शहरातून जकात हटवा मोहीम - Marathi News 24taas.com

नाशिक शहरातून जकात हटवा मोहीम

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक शहरातून जकात हटवा, अशी मोहीम जोरदार सुरू झालीय. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केलाय. जकातीच्या खासगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागलेत.
 
 
नाशकात खाजगी ठेकेदारांना जकातीचा ठेका दिल्याबद्दल नाशिककरांमध्ये प्रचंड रोष आहे.    खाजगी जकात ठेकेदारांकडून आर्थिक लूट केली जाते, तसंच चार चार दिवस माल अडवून ठेवला जातो, खाजगी ठेकेदार मनमानी आणि दमदाटी करतात, असे आरोप होतायत.   जकातीला पर्याय म्हणून LBT अर्थात स्थानिक संस्था कर लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
निवडणुकीआधी जकात खाजगीकरणाला विरोध करणा-या मनसेनं आता मात्र राज्य सरकारच्या कोर्टात चेंड़ू टाकला आहे. जकातीला पर्याय शोधताना महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच सर्वमान्य पर्याय शोधण्याची कसरत सत्ताधा-यांना करावी लागणार आहे. त्यातही मनसेची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊन काय भूमिका घेणार आणि त्यातून सत्ताधारी कसे मार्ग काढणार, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.
 

First Published: Saturday, March 31, 2012, 08:12


comments powered by Disqus