मालेगावच्या निवडणुकीत धार्मिक रंग - Marathi News 24taas.com

मालेगावच्या निवडणुकीत धार्मिक रंग

www.24taas.com, मालेगाव
 
मालेगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागलाय. उन्हाचा पारा ४० अंशावर गेला असताना राजकीय मुद्देही तापू लागले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामीनावर सुटलेल्या आरोपींना समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत धार्मिक रंग भरले जात आहेत.
 
मालगेवामध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातले हे आरोपी आता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तब्बल तीन आरोपी आणि एका आरोपीची पत्नी समाजवादी पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मालेगावच्या राजकारणाला पुन्हा एकदा धार्मिक रंग  देण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टीकडून केला जोतोय. तिसरा महाजनं मात्र या प्रकरणी राजकारण करणार नसल्याचं सांगितलंय.
 
गेल्या दहा वर्षांपासून शहरात शांतता नांदत आहे. अशा स्थितीत विनाकारण धार्मिक तेढ निर्माण केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. गेल्या निवडणुकीत मालेगावच्या जनतेनं विकासाच्या मुद्दावर मतदान केलं होतं. निहाल अहमद यांची सत्ता खालसा करुन विकासाच्या नावावर मतं मिळवलेल्या तिसरा महजनंही पाच वर्षात अपेक्षित विकास केलेला नाही. त्यामुळं आता मालेगावचे मतदार एखाद्याच्या पारड्यात बहुमत टाकतात की त्रिशंकू स्थिती येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 13:48


comments powered by Disqus