नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी

www.24taas.com,नाशिक
 
 
पुण्यानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला आहे. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव आहे.
 
 
1 एप्रिलपासून ते जिल्हा रुग्णालयात दाखल होते. शहरात स्वाईन फ्लूची साथ सुरु झाली असून, त्यात पहिला बळी गेल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालय. नाशिककरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य यंत्रणेनं केलं आहे. याआधी पुण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू होते. पुण्यात एका विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
पुण्यातील दीप बंगला चौक आणि खराडी येथील शाळेमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून या दोन शाळांची तपासणी करण्यात आली होती.  सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन  आरोग्य यंत्रणेने केले आहे.
 
 
आणखी संबंधित बातमी
 
पुण्यात स्वाईनचा धोका वाढला
 
पुण्यात स्वाईन फ्लूने महिलेचा बळी

First Published: Tuesday, April 3, 2012, 21:27


comments powered by Disqus