बिबट्याने घेतला बालकाचा बळी - Marathi News 24taas.com

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.
 
उसात लपलेल्या बिबट्यानं घराच्या ओसरीबाहेर रांगत असलेल्या बालकाला जबड्यात पकडून शेतात नेलं. गोसावी कुटुंबियांनी आरडाओरड करताच गावकरी बिबट्याचा शोध घेऊ लागले. उसाच्या शेतातच बालकाचा मृतदेह आढळला. दुर्देवाची बाब म्हणजे चिमुरड्या दुर्गेशचा आज वाढदिवस होता.
 
दुर्गेश हा तीन मुलींच्या पाठीवर झालेला हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनं गोसावी कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. गेल्या महिन्याभरातला बिबट्याचा हा दुसरा हल्ला होता. त्यात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. वन विभागानं पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
 
 
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 17:23


comments powered by Disqus