Last Updated: Friday, April 6, 2012, 15:21
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये मुलींची चक्क विक्री होत असल्याचं समोर आलंय. श्रीमंत घरात लग्नाचं आमिष दाखवून मुलींची दोन दोन लाखांना विक्री होते.
आणखी धक्कादायक बाब म्हणजे महिलांकडूनच मुलींची विक्री केली जाते. रामवाडीतल्या एका महिलेनं हा धंदा सुरू केल्याची माहिती आहे. औरंगाबादमध्ये विकण्यात आलेली एक मुलगी परत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
या टोळीनं अल्पवयीन मुलींची विक्री केल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी या प्रकरणी रितेश कोठारी, नंदलाल कोठारी यांना ताब्यात घेतलंय. तर मुख्य सूत्रधार जया शर्मासह इतर आरोपी फरार आहेत.
First Published: Friday, April 6, 2012, 15:21