शरद पवार मंत्र्यांना घालतायेत पाठिशी? - Marathi News 24taas.com

शरद पवार मंत्र्यांना घालतायेत पाठिशी?

www.24taas.com, नाशिक
 
कॅगच्या अहवालात राज्य़ातल्या हेवीवेट मंत्री आणि नेत्यांवर  ताशेर ओढण्यात आले आहेत. पण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र या मंत्र्यांची पाठराखण केली आहे. शैक्षणिक कार्यासाठी सवलतीत जमिनी देणं सरकारचं कर्तव्यच असल्याचं पवार म्हणाले.
 
पवारांनी नेत्यांची पाठराखण जरी केली असली तरी छगन भूजबळांना कानपिचक्या द्यायला मात्र ते विसरले नाहीत. भुजबळांच्या एमईटीवर धर्मादाय आयुक्तांच्या कारवाईचं पवारांनी समर्थन करत भुजबळांना कानपिचक्या दिल्या आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
 
सवलतीच्या दरांत ज्या ज्या नेते किंवा मंत्र्यांना सरकारनं जमिनी दिल्या त्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. मात्र पवारांनी इतर मंत्र्यांना पाठिशी घातले आहे. त्यामुळे पवारांनी घेतलेला पवित्रा नक्की काय आहे हे पाहण ं  औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, April 8, 2012, 13:01


comments powered by Disqus