Last Updated: Thursday, April 12, 2012, 13:27
www.24taas.com, नाशिक नाशिकची महापालिका काबीज केल्यानंतर मनसेनं आता मालेगावची महापालिकाही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे सर्व पदाधिकारी मालेगावात तळ ठोकून आहेत.
शिवसेनेचं नाशिकच्या ग्रामीण भागातलं वर्चस्व उखडून टाकण्यासाठी कार्यकर्ते चांगलेच कामाला लागलेत. आज खुद्द राज ठाकरे प्रचारासाठी मालेगावात येत आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अरुण गुजराथी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार मालेगावात याआधी हजेरी लावून गेलेत. अशी रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यानं अजूनही मालेगावात हजेरी लावलेली नाही.
सेनेची जिल्हा आणि शहर कार्यकारणी अद्याप बरखास्त अवस्थेत असून या सुंदोपसुंदीचा फायदा मनसेलाच अधिक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान आजच्या जाहीर सभेत राज ठाकरे बिहार दिनावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, April 12, 2012, 13:27