Last Updated: Friday, April 13, 2012, 10:13
www.24taas.com, मालेगाव 
मुंबईत बिहार दिन साजरा करण्याच्या नितीशकुमारांच्या आव्हानाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंची थोड्याच वेळात मालेगावमध्ये तोफ धडाडणार आहे. राज यांची सभा होणारं आहे.
नाशिकची महापालिका काबीज केल्यानंतर मनसेनं आता मालेगावची महापालिकाही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. यासाठीच राज ठाकरे आज प्रचारसभेसाठी मालेगावामध्ये येताएत. त्यामुळेच नितीश कुमारांच्या वक्तव्याचा ते कसा समाचार घेतात याकडेच सगळ्यांच लक्ष लागलंय
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत धडाडण्यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये फावला वेळ श्वानासोबत खेळण्यात घालवला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांच्या बंगल्यावरील फ्युरर या श्वानासोबत चेंडू खेळत निवांत क्षण अनुभवले. राज ठाकरेंचे श्वानप्रेम सर्वानाच माहिती आहे. त्यांच्या मुंबईतल्या बंगल्यावरही ते बऱ्याच वेळा आपल्या श्वानासोबत खेळत असतात.
First Published: Friday, April 13, 2012, 10:13