Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:22
www.24taas.com, मालेगाव
राज ठाकरे यांनी आज मालेगावत प्रचार सभा घेतली, ह्या प्रचार सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते, राज ठाकरे यांनी नीतिश कुमार आणि अबू आझमी यांचा चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे यांनी बिहार दिनाबद्दल बोलले. काय बोलले राज ठाकरे यांच्या भाषण त्यांच्याच शब्दात. अशी केली राज ठाकरे यांनी फटकेबाजी - आम्ही शहरं खराब करून दाखवू अशी यांची वृ्त्ती आहे - मी सांगत नाही की माझ्या हातात सत्ता द्या, मी चमत्कार घडवून दाखवेल, अजिबात नाही - माझ्या हातात फक्त महापालिका देऊ नका, माझ्या हात महाराष्ट्र देऊन बघा - फालतू आश्वासने देणार नाही -दिवसेंदिवस शहरं बकाल होत आहेत - मालेगाव हा अतिरेक्यांचा अड्डा आहे - पाकिस्तान बांगलादेश मधून येणारे लोक मराठी माणसांच्या नावाने राहतात - मालेगावात आलेल्या अतिरेक्यांना पोसतं कोण? - आमच्याकडे फक्त निव़डणूका सुरू असतात, विकास कामं नतंर आधी निवडणूका - महाराष्ट्राने परप्रांतीय लोकांना पोसायचा ठेका घेतला आहे का? - महाराष्ट्रात निवडणुकांचा धंदा सुरू आहे - एप्रिल महिन्यातच पाण्याचा महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मला पाण्याचं राजकारण करायचं नाही - राजकारण्यांची ५ - ५ हजार हेक्टर जमिनी आहेत, काय करायचं आहे एवढी जमीन घेऊन नागडं नाचायचं आहे का? - पाणीप्रश्न हा फक्त राजकर्त्यांमुळेच आहे - हे राज्य माझ्या हातात द्या - काही करून दाखवलं नाही तर यापुढे तुमच्या समोर कधीच येणार नाही - राज्यातील नेत्यांचा फक्त जमिनीवरच डोळा आहे- - बाहेरून येणारे लोंढे हे महाराष्ट्राला मारक ठरणार - प्रॉपर्टी जमवण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही - महाराष्ट्र अजूनही बेसावध आहे - फक्त हा महाराष्ट्र पोसण्यातच पुढे आहे - बिहार दिनाबद्दल कोण बोललं होतं का? आता मी बोलतो - नितीशकुमार तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच - प्रत्येकांने आपआपल्या राज्यात राज्यदिन साजरे करावे - १०० वर्षाचा आनंद बिहारमध्ये साजरा करावा - उत्तरप्रदेश सिर्फ झाँकी हे, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्र काय तुमच्या बापाचा माल आहे? - नितीशकुमारांची नाटकं सहन केली जाणार नाही - पैशाच्या जोरावर फक्त अमराठी टक्का वाढतो आहे - हे लोकं त्यांची संख्या वाढवत आहेत, त्यामुळे तिथं त्यांचा मतदार द्यावा अशा मागण्या होऊ लागतील - महाराष्ट्रात यायचं असेल तर यापुढे परप्रांतियांना व्हिसा (VISA) लागेल - अबू आझमी हा तर सागरगोटा आहे - विधानसभेच्या वेळी दोन मतदारसंघातून निवडून येतोच कसा? - मला राजकारण करायचं नाही विकास करायाचा आहे - मला देश तोडायचा नाही, मी महाराष्ट्र विरूद्ध बिहार असं मह्णतं नाही, मी फक्त या लोकांच्या नेत्यांविषयी बोलतो आहे - मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका - या सरकारला मला अटक करायची असेल तर खुशाल करावी - पण मला अटक केल्याचे परिणाम काय होतात हे मागच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे
First Published: Thursday, April 12, 2012, 21:22