राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - Marathi News 24taas.com

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

www.24taas.com, मालेगाव 
राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ  मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
 
 

राज ठाकरे यांच्या भाषणातील  ठळक मुद्दे


*  नीतिश कुमारांनी १५ एप्रिलाला महाराष्ट्रात बिहार दिन साजरा करून दाखवावा
*  बिहार दिन २३ मार्चला आणि साजरा करणार १५ एप्रिल
*  नीतिश कुमार असे भिकार राजकारण करणार असे वाटले नाही
*  महाराष्ट्राला ५० वर्ष झाले आम्ही गेलो होतो का तिथे
*  महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
*  दिल्ली, मुंबई आणि कोलकत्त्यात बिहार दिन साजरे करणार, तर चेन्नई, गुजरातमध्ये काही नाही
*  महाराष्ट्र काय बापाचा माल आहे का?
*  बिहार सारखा भकास प्रदेश चांगला करावा ।
*  नीतिश कुमारांनी ५० हजार गुंडांना जेल मध्ये टाकले चांगले केले,  पण ही नौटंकी कशाला करायची
*  टक्का वाढविणार आणि नगरसेवक, आमदार, खासदार बनविणार
*  राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला
*  मला बिहारी विरुद्ध महाराष्ट्र राजकारण करायचे नाही
*  अबू आझमी नावाचा सागर गोटा
*  अबू आझमी हा भिवंडी आणि मुंबईतून येतो कसा
*  तो निवडून आला तो फक्त बाहेरच्या लोकांमुळेच
*  राज ठाकरे संकुचित वृत्तीचा नाही
*  मुख्यमंत्री, आर. आर. पाटील आणि अजित पवारांनी नीतिश कुमारांनी येथे न येण्याचे आवाहन करावे
*  शहरांची वाट लावण्यात सर्व पक्षांची चुरस
*  माझ्या हाता महापालिका नाही तर महाराष्ट्र माझ्या हातात द्या
*  शहरं दिवसेंदिवस खराब होत चालली आहेत
*  मालेगाव खराब होत आहे
*  मुस्लिम नेत्यांनी मालेगावातील जनतेला फसवले
*  मराठी मुस्लिम पट्ट्यात इतर प्रांतातील लोक येतात
*  दहशतवाद्यांचे अड्डे बनविण्याचे शहर मालेगाव झाले आहे
*  निवडणुकांचा धंदा सुरू, दुसरीकडे लक्ष नाही
*  अशा निवडणुका मला लढायच्या नाहीत
*  महाराष्ट्राच्या प्रगतीमुळे बाहेरून लोक येतात
*  नेत्यांच्या महाराष्ट्रात ५ हजार एकर जमिनी
*  काय नागडे नाचणार आहे
*  महाराष्ट्रात भीषण दुष्काळ, विरोधक नुसते बोंब मारताय
*  गावांबरोबर शहरांमध्येही पाणी टंचाई
*  रस्ते, वीज, पाणी आणि नोकरी  याच मुद्द्यावर निवडणुका लढविल्या जातात
*  विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडणून द्या
*  एकदा निवडून द्या काही केलं नाही, तर दुसऱ्यांदा मतं मागायला येणार नाही
*  आपण बेसावध आहोत, त्यामुळे परकीय आक्रमण होत आहेत
*  राजकारणी आपले पोटं भरण्यात मशगुल
 
 

First Published: Thursday, April 12, 2012, 21:00


comments powered by Disqus