Last Updated: Friday, April 13, 2012, 16:48
www.24taas.com, नाशिक आपापसातील आर्थिक व्यवहारातील वादातून नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय. या हल्ल्यात सुशिला कसबे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
हल्लेखोर तात्या लवटे हा शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटेंचा भाऊ असून तो फरार झालाय. कसबे यांच्यावरून काल रात्री देवळाली गावात दोघांमध्ये वाद झाले. त्याचाच राग मनात ठेवून तात्या लवटेनं या महिलेवर ऍसिड फेकलं.
यात सुशीला कसबे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणातील हल्लेखोर तात्या लवटे अजूनही फरार आहे.
First Published: Friday, April 13, 2012, 16:48