Last Updated: Monday, April 16, 2012, 10:50
www.24taas.com, मुंबई मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला आहे. मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मालेगावमध्ये शिवसेनेला -५ , काँग्रेसला -५, राष्ट्रवादीला-२, समाजवादी-१ तर तिसरी महजला ३ जागांवर विजय मिळाला आहे. भिवंडी - विजयी जागा - शिवसेना – २ काँग्रेस – ४ राष्ट्रवादी – २ । परभणी – विजयी जागा – शिवसेना – १ काँग्रेस – ११ राष्ट्रवादी - ५ । भिवंडी २ जागांवर काँग्रेस विजयी । भिवंडीत एकूण ४ जागांवर विजयी । परभणीत काँग्रेस २ जागांवर तर राष्ट्रवादी २ जागांवर विजयी । राष्ट्रवादी सात जागांवर आघाडीवर । लातूरमध्ये २० जागांवर काँग्रेस आघाडीवर ।
राज्यातील पाच महापा

लिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी8 वाजता सुरू झाली आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात झाली. राज्यातील लातूर, परभणी, मालेगाव, भिवंडी आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी रविवारी मतदान झाले.दरम्यान, काल पाच महापालिकांसाठीचं मतदान आज शांततेत पार पडलं..भिवंडीत ५१.३७ टक्के, लातूरात ५८ टक्के, परभणीत ५६.६६ टक्के तर मालेगावात ६३.११ टक्के मतदान झालं.
मालेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर सभेनंतर या ठिकाणी काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच भिवंडीत अबू आझमी काय प्रभाव पाडणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. भिवंडीमध्ये शिवसेनाही सत्तेसाठी प्रबळ दावेदार म्हणून उभा ठाकला आहे. व्हिसलिंग वुड्स, आदर्श अशा अनेक वादांच्या मुद्द्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा लातूर महापालिकेच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
First Published: Monday, April 16, 2012, 10:50