Last Updated: Friday, April 20, 2012, 21:22
www.24taas.com, शिर्डी शिर्डीच्या साईभक्तांना भर उन्हाळ्यातही थंडा थंडा कूल कूल वातावरणाचा अनुभव आता घेता येणार आहे. कारण साईभक्तांच्या दर्शनबारीत कृत्रिम धुके तयार करणारी यंत्रणा बसवण्यात आली आली आहे.
तुलनेने कमी खर्च आणि चांगला गारवा देणारी हि यंत्रणा असल्यानं साईभक्तांनी या उपक्रमाचे स्वागत केलंय. साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना 2-3 तास रांगेत उभं राहावं लागतं. तसंच गर्दीमुळं जाणवणा-या प्रचंड उकाड्यामुळं भाविक हैराण होतात. त्यामुळं ही नवीन यंत्रणा साई संस्थानच्या वतीनं उभारण्यात आलीय. या सुविधेवर भाविक प्रचंड खूष आहेत.
साई संस्थानकडे सध्या 300 किलो सोनं, 3 हजार किलो चांदी जमा आहे. तंसच विविध बँका, रोखे मिळून 627 कोटींची गुंतवणूक आहे. या उत्पन्नातून साई संस्थान प्रामुख्यानं भक्तांसाठी चालवलं जाणारं प्रसादालय, रुग्णालयं, शाळा, कर्मचाऱ्यांचे पगार यावर खर्च करतं. पायाभूत विकासासाठीही संस्थानाकडून शिर्डी नगरपालिकेला निधी दिला जातो. याशिवाय राज्यातल्या काही सामाजिक संस्था, धार्मिक तीर्थक्षेत्र यांनाही विकासकामांसाठी संस्थानाच्या माध्यमातून निधी दिला जातो.
First Published: Friday, April 20, 2012, 21:22