Last Updated: Saturday, April 21, 2012, 17:36
www.24taas.com, नाशिक 
नाशिकच्या पारिजातनगरमधल्या एका हुक्कापार्लवर पोलिसांनी छापा टाकून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे. हुक्का पार्लरमुळे तरूण पिढी ही व्यसनाकडे ओढली जात आहे. त्यामुळेच अशा हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिसांनी हुक्का पार्लरविरोधात कडक मोहिम उघडली आहे. पारिजातनगर परिसरात चहाची टपरी चालवणाऱ्या साईचरण सखाराम डोंगरे यांनी अरुणोद्य अपार्टमेंटमध्ये हे पार्लर सुरु केलं होतं.
गेल्या चार पाच दिवसांपासून ताब्यात घेण्यात आलेले तरुण- तरुणी या पार्लरमध्ये येत होते. तसेच हे सर्व बड्या घरातले असल्याचही तपासात उघड झालं आहे. याप्रकऱणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Saturday, April 21, 2012, 17:36