नाशिकमध्ये दोन गटात तुफान हाणामारी - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. नाशिक रोडच्या पांढूर्ली गावात ही घटना घडली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
 
नाशिकमधील पांढुर्ली गावात दोन गटात प्रचंड हाणामारी झाली आहे. त्यामुळे तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आल ं आहे. दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी सुरू असल्याने तेथील वातावरण चिंताजनक  झालं आहे.
 
दोन गटाच्या या हाणामारीमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक  करण्यात येत आहे.  त्याचबरोबर अनेक घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत. त्यामुळे लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल. पण सध्यातरी हाणामारी मागचं कारण समजू शकलं नाहीये.
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 22:38


comments powered by Disqus