नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक शहरात विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झालाय. जया अमन शर्मा असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. दिंडोरी रस्त्यावरील खान्देश गल्लीत ही घटना घडली.
 
गच्चीवर कपडे वाळत टाकण्यासाठी जया शर्मा गेल्या असता त्यांना विजेच्या तारांचा जोरदार शॉक बसला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी जया यांचा मृतदेह पंचवटी वीज कार्यालयासमोर आणून कारभाराचा निषेध केला.
 
दरम्यान, वीज कार्यालयानं शर्मा कुटुंबियांना २० हजारांची तत्काळ मदत करुन घटनेची जबाबदारी घेतली. शहरात अनेक ठिकाणी वीज तारा आणि विजेचे खांब घराच्या अगदी जवळून गेल्या आहेत. डीपीही उघड्या पडल्या आहेत. त्यामुळं नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

First Published: Wednesday, April 25, 2012, 19:39


comments powered by Disqus