भाजपाचे आ. गिरीश महाजन यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News 24taas.com

भाजपाचे आ. गिरीश महाजन यांची प्रकृती चिंताजनक

झी २४ तास वेब टीम, जळगाव
जळगावात गेल्या नऊ दिवसांपासून कापूस दरवाढीसाठी उपोषणास बसलेल्या आमदार गिरीश महाजन यांची प्रकृती आणखी खालावली. महाजन यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 
महाजन यांचं वजन सहा किलोनं घटलं असून त्यांना पॅरालिसीस होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळेच डॉक्टरांनी महाजन यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली होती. त्यानुसार महाजन यांनी उपचार घेण्यासाठी अनुकुलता दर्शवली. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.
 
 

First Published: Friday, November 25, 2011, 12:12


comments powered by Disqus