ऐन उन्हाळी सुट्टीत तरण तलावाची दुरुस्ती - Marathi News 24taas.com

ऐन उन्हाळी सुट्टीत तरण तलावाची दुरुस्ती

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका असंख्य जलतरणपटूना बसतोय. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या एकमेव जलतरण तलावाच्या दुरूस्तीच काम ऐन उन्हाळ्यात सुरु असल्यानं जलतरणपटूना जलतरणापासून वंचित राहव लागतं.
 
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळा-कॉलेजची मुलं विरंगुळा म्हणून आधार घेतात तो जलतरण तलावाचा. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात स्वीमिंगचा हा आनंद त्यांना घेताच येत नाहीये.  कारण गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जलतरणाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. आणि पावसाळा उजाडेल तरी हे काम पूर्ण होण्याची शाश्वतीही नाही. त्यामुळे मनपाच्या अजब कारभाराविषयी प्रचंड नाराजी नाशिककरांकडून व्यक्त होतेय.
 
विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनासमोर तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर महापौरांनी ठेकेदार आणि अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं.  महापालिकेच्या गलथान कारभारामुळे गेल्या २८ वर्षांपासून सुरू असणाऱ्या तलावाला ऐन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येच खंड पडलाय. त्यामुळे नियमीत सराव करणाऱ्या आणि प्रशिक्षण घेणाऱ्या नवोदित अशा सर्वांचीच गैर सोय झालीय. त्यामुळे प्रशासन किती गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघतं त्यावरच या कामाची गती अवलंबून राहणार आहे.

First Published: Thursday, April 26, 2012, 20:38


comments powered by Disqus