Last Updated: Saturday, April 28, 2012, 18:00
www.24taas.com, नाशिक 
नाशिकमधल्या निफाड तालुक्यातल्या शिवरे गावात ६ वर्षांच्या बालिकेवर एका बिबट्यानं हल्ला केला. त्यात त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पल्लवी बाळासाहेब सानप असं तिचं नाव आहे.
रात्री साडेआठच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. तिचं ओरडणं ऐकून लोकांनीही आरडाओरड केली त्यामुळे बिबट्यानं तिला सोडून तिथून पोबारा केला.
मात्र या हल्ल्यानं भेदरलेल्या मुलीचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरातली ही तिसरी घटना असल्यानं गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी नाशिक - औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको केला.
First Published: Saturday, April 28, 2012, 18:00