...अबब सोन्याचा भाव @ २९,९०० - Marathi News 24taas.com

...अबब सोन्याचा भाव @ २९,९००

www.24taas.com, जळगाव
 
सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळाली आहे. सोन्याचा दर २९ हजार ९०० रुपयांवर गेला आहे. सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज सोन्याचा भावाने उच्चांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे.
 
देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधन आयातीनंतर सोन्याच्या खरेदीवर खर्च होतं आहे. अलिकडच्या काही दिवसांत डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याची आयात महाग होऊन त्याचा परिणाम दरावर होत आहे. डॉलरच्या किमतीत वाढ झाल्याने सोन्यात गुंतवणूक वाढत असल्यामुळे सोन्याचे भाव कडाडले असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
लग्नाच्या सीझनमध्ये सोनं महागल्यानं ग्राहकांना सोनं खरेदी करणं अवघड होणार आहे. मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त नसल्याने सोन्याची खरेदी मंदावली असली तरी, सोन्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, April 28, 2012, 18:31


comments powered by Disqus