Last Updated: Saturday, April 28, 2012, 23:56
www.24taas.com,

निफाड तालुक्यातील शिवरे गावात बिबट्याच्या हल्लाला अर्धा दिवस उलटत नाही तोच तालुक्यातील गिरणारे गावात बिबट्याचं दर्शन घडलं आहे. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे.
धोंडेगाव शिवारात बळवंत भिका मोरे यांच्या मक्याच्या शेतात सकाळी सहा वाजता बिबट्या दिसला. साडेदहा वाजेपर्यंत तो शेतातच दबा धरुन होता. काही ग्रामस्थांनी बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक तरुण जखमीही झाला. दरम्यान, साडगाव शिवारात वनविभागानं पिंजरा लावला आहे.
नाशिकमधल्या निफाड तालुक्यातल्या शिवरे गावात ६ वर्षांच्या बालिकेवर एका बिबट्यानं हल्ला केला होता. त्यात त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पल्लवी बाळासाहेब सानप असं तिचं नाव आहे. रात्री साडेआठच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. तिचं ओरडणं ऐकून लोकांनीही आरडाओरड केली त्यामुळे बिबट्यानं तिला सोडून तिथून पोबारा केला.
First Published: Saturday, April 28, 2012, 23:56