नाशकात मॉलला आग, एकाचा मृत्यू - Marathi News 24taas.com

नाशकात मॉलला आग, एकाचा मृत्यू

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ साखला शॉपिंग मॉलला लागलेली भीषण आग विझवण्य़ात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर शॉपिंग मॉलचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे.
 
 
शॉपिंग मॉलच्या वरच्या मजल्यावरील इन्श्युरन्स ऑफिस ही आग लागली होती. मात्र आगीची तीव्रता वाढल्यामुळं ऑफीसमधून सुरक्षा रक्षकाला बाहेर पडणं कठीण झालं आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला. प्रकाश सोळंखी असं नावं आहे.
 
 
दाट वस्तीच्या परिसरात हा मॉल असला तरी या आगीमुळं परिसरातल्या कुठल्याही मालमत्तेच नुकसान झालेलं नाही. साडेतीन तासांच्या अथक परिश्रमांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. रात्री अडीचच्या सुमाराला ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या आठ बंबांनी ही आग आटोक्यात आणली.

First Published: Wednesday, May 2, 2012, 09:23


comments powered by Disqus