दरोडा पडला... आमदारांच्याच घरी - Marathi News 24taas.com

दरोडा पडला... आमदारांच्याच घरी

www.24taas.com, नाशिक 
 
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात भाजप आमदार उमाजी बोरसे यांच्या शेतातल्या घरावर सशस्त्र दरोडा पडला आहे. मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. जायखेडा गावाजवळ असलेल्या बंगल्यावर हा दरोडा पडला.
 
सुमारे बावीस लाखाचं सोनं, मोटार सायकल आणि आठ ते 10 लाखांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली. पोलीस याप्रकरणी माहिती घेण्याचं काम सुरु आहे. दरम्यान दरोडेखोरांनी चोरलेली मोटरसायकल सापडली आहे.
 
नाकाबंदी करून या दरोडेखोरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यरात्री दिडच्या सुमाराला दरोडेखोरांनी बंगल्यात घुसून घरातल्या सगळ्यांना एका खोलीत डांबलं आणि बंदुकीचा धाक दाखवून आमदार बोरसेंच्या मुलाला सोबत घेऊन घरातला जवळपास ३० ते ३२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 17:30


comments powered by Disqus